२० हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:53 AM2020-02-12T00:53:49+5:302020-02-12T00:54:55+5:30
शेतीचा रस्ता खुला करून देण्यासाठी तक्र ारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रानवडचे मंडल अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे याला निफाड तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
निफाड : शेतीचा रस्ता खुला करून देण्यासाठी तक्र ारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रानवडचे मंडल अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे याला निफाड तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
शेताचा रस्ता खुला करून देण्याच्या कामासाठी रानवडचे मंडल अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे (५१) रा. मखमलाबाद रोड, पंचवटी यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी
तक्र ारदाराकडे २० हजार रु पयांची मागणी केली होती. याबाबत तक्र ार केल्यानंतर निफाड तहसील कार्यालयात दि. ११ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शिंदे यास पंचासमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, उज्ज्वल पाटील, प्रकाश महाजन, बाविस्कर, दाभोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.