गिरणा नदीला उद्यापासून आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 10:41 PM2022-04-07T22:41:43+5:302022-04-07T22:42:15+5:30
देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार आहेर यांना दिले.

सदर बैठकीस गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील व मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाणी टंचाईबाबत तसेच देवळा, कळवण व मालेगाव या तालुक्यातील जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गिरणा नदी कोरडी पडली आहे.
त्यातच तीव्र उन्हाळा सुरू असल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून तीव्र पाणी टंचाईमुळे जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तसेच शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा असल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांचीदेखील गर्दी वाढत जाणार असल्याने तसेच तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पाण्याअभावी पिके खराब होत असल्याचे आहेर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना अवगत करून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आमदार आहेर यांना दिले.