दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 06:24 PM2020-09-08T18:24:07+5:302020-09-08T18:24:33+5:30
नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनद्वारे दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे नळांद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दी, पोट दुखणे आदीं आजारांना सामोरे जावे लागत असल्यामुळे या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळेच गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे नमुने सरपंच रोकडे यांना दाखवले. मुख्य पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनची ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून याच पाशर््वभूमीवर आरोग्य विभागाकडून वेळोवेळी स्वच्छतेविषयी देखील सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दोन मिहन्यांपासून गावात जंतूनाशक औषधांची फवारणी देखील करण्यात आली नसून सध्या गावामध्ये कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसातच नांदूरवैद्य येथील नागरिकांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पाईपलाईनद्वारे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. सध्या नवीन पाईपलाईनचे काम सुरु असून सध्या होत असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येऊन नागरिकांना दुषित पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचाव करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
----------------- प्रतिक्रि या
" गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असून आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त