दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2015 09:55 PM2015-11-22T21:55:05+5:302015-11-22T21:56:02+5:30

दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

Citizens anxious with Dengue-like illness in Daregaon | दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

दरेगाव येथे डेंग्यूसदृश आजाराच्या धास्तीने नागरिक चिंताग्रस्त

Next

दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विविध विषाणूजन्य आजारांनी अनेक नागरिक हैराण झाले आहेत. सध्या डेंग्यूच्या साथीबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने धुळे येथील शासकीय प्रयोगशाळेत १३ संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, त्यापैकी १२ रुग्णांना विषाणूजन्य आजारांची, तर एका रुग्णास प्राथमिक अवस्थेत डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
गावातील अन्य तीन महिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत; मात्र त्यांच्या आजाराचे निदान नसल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गावात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात थंडी, ताप, हातपाय दुखणे व अन्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण वाढत असल्याने नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा बऱ्याच दिवसांनी केला जात असल्याने ग्रामस्थ पिण्याचे पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. गावात व परिसरात ग्रामपंचायतीने अस्वच्छ जागा स्वच्छ करावी तसेच गावात पाणीपुरवठा लवकर करावा, त्यामुळे पाणी जास्त दिवस साठविले जाणार नाही. तसेच फॅगिंग मशिनद्वारे नियमित फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, चांदवडचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी गावात भेट दिली असता, नागरिकांनी त्यांना गावातील आरोग्यविषयक अडचणी सांगितल्या. त्यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे, दरेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल देवरे, आरोग्य सहाय्यक एन. एम. गोजरे, आरोग्य पर्यवेक्षक डी. एम. पाटील आर. एस. नवले आदिंच्या पथकांने सहा विभाग करून जबाबदारी निश्चित केली. आरोग्य पथकामार्फत गावात सर्वेक्षण करण्यात आले. पथकात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी, कार्यकर्ता, आशा आरोग्य सहाय्यक आदि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. (वार्ताहर )

Web Title: Citizens anxious with Dengue-like illness in Daregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.