नाशकात आगीच्या घटनेने नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:33 PM2018-03-14T18:33:10+5:302018-03-14T18:33:10+5:30
नाशकात मोकळया भूखंडाला बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. भूखंडाजवळच वीज रोहित्र व नागरी वसाहतीसोहतच चारचाकी वाहनांच्या शोरूमही असल्यामुळे ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. याचवेळी अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविणो शक्य झाले.
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील एका तीन एकरच्या मोकळया भूखंडाला बुधवारी (दि.14)दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. भूखंडाजवळच वीज रोहित्र व नागरी वसाहतीसोहतच चारचाकी वाहनांच्या शोरूमही असल्यामुळे ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. याचवेळी अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविणो शक्य झाले. पाथर्डी फाटा परिसरात आग लागल्याची माहिती मिळतात अग्नीशमन दलाचे पथकाने एका बंबासह घटनास्थळी दाखल होत एक तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु मोकळ्य़ा भूखंडावरील वाळलेले गवत आणि कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबधीत भूखंडावर मोठय़ा प्रमाणात वाळलेले गवत वाढलेले असल्याने येथे लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. आगीची घटना घडलेल्या भूखंडाला सिमेंटच्या फळक्यांचे कुंपण घातले असल्याने त्याच्या आतील कचरा व वाळलेले गवत याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने या भूखंडावर अनेक झाडे झुडपांमुळे डिम्पंग ग्राऊंडचे स्वरूप आले होते. याठिकाणी बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले.
आगीने पेट घेण्यास सुरुवात झाली त्यावेळी जोरदार हवा सुरू असल्याने गवत आणि कचऱ्याने वेगाने पेट घेतला. भूखंडावर सर्वत्र वाळलेले गवत अशल्याने आग झपाट्याने पसरल्याने परिसरात धुराचे लोळ उठू लागले. या परिसरत असलेले विद्युत रोहित्र शोरूम व वसाहतीला धोका पोहोचून नये म्हणन नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.त्यानंतर सिडको विभागातील अग्निशमन दलाचा एक बंब व सहा कर्मचारी घटनास्थीळ दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्नण मिळविले. या आगीमुळे वासननगरात सर्वत्र धूर व वाऱ्यासोबत उडणारी राख पसरल्याने नागरिकांना मोठय़ा प्रमाणात त्रससहन करावा लागल्याने मोकळे भूखंड आणि त्यांची स्वच्छते विषयी महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी परिसराती नागरिकांनी केली आहे.