नागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:28+5:302021-05-15T04:13:28+5:30

भाजीपाला उत्पादक अडचणीत नाशिक : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, भाजीपाला नेमका कसा विकायचा, असा प्रश्न अनेकांसमोर ...

Citizens are also responding | नागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

नागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

Next

भाजीपाला उत्पादक अडचणीत

नाशिक : लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, भाजीपाला नेमका कसा विकायचा, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. राज्य शासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सेवाभागी संस्थांच्या उपक्रमामुळे दिलासा

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात अनेक सेवाभावी संस्थांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा समाना करावा लागत आहे. अशावेळी मिळणारी मदत बहुमोल ठरत आहे.

राजरोसपणे अवैध मद्य विक्री

नाशिक : शहरातील अनेक परिसरात राजरोसपणे अवैध मद्य विक्री होत असून, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांकडेही दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आइस्क्रीम विक्रेते अडचणीत

नाशिक : सलग दुसऱ्या वर्षीही आइस्क्रीम विक्रेत्यांचा व्यावसाय अडचणीत आला असून, या व्यवसायिकांना घरातून वीजबिल, दुकानाचे भाडे भरावे लागत आहे. कोरोनामुळे आइस्क्रीमच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला असून, अनेक नागरिक आइस्क्रीमची खरेदी टाळत आहेत.

शेती मशागतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला असून, शेतीच्या मशागतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. डिझेलचे दर वाढल्याने जमीन नांगरणी, वखरणीसह इतर सर्वच कामांचे दर ट्रॅक्टरचालकांनी वाढविले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

लसीकरणाचे नियोजन करण्याची मागणी

नाशिक : शहरात लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक ठिकाणी काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. महापालिकेने याबाबत योग्य ते नियोजन करून सर्व नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी

नाशिक : लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत वेगवेगळी माहिती प्रसारित होत असल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेकांना मुदत संपूनही अद्याप दुसरा डोस मिळालेला नाही.

Web Title: Citizens are also responding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.