बँकांच्या सुट्यांमुळे नागरिकांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:01 AM2017-10-03T00:01:07+5:302017-10-03T00:01:13+5:30
नाशिक : ऐन सणासुदीच्या दिवसात बँकांना तीन दिवस सुटी आल्याने आणि शहरातील विविध एटीएममध्ये पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या महिनाअखेरीस दसरा व त्यानंतर चालू महिन्याच्या प्रारंभीच आलेला रविवार तसेच सोमवारी महात्मा गांधी जयंतीमुळे बँकांना सुटी असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली असून, या तीन दिवसांमध्ये एटीएममधूनही पुरेसा पैसे मिळू न शकल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली.

जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी बँकांनी कोणतीही तरतूद केली नसल्याने शहरातील विविध भागांमधील एटीएममध्येही खडखडाट झाल्याचे दिसून आले. या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील, अशा सुट्या येत आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या तीन दिवसांत आॅनलाइन व्यवहार करणाºयांना आर्थिक अडचणी कमी प्रमाणात आल्या असल्या तरी अजूनही शहारातील जवळपास ४० ते ५० टक्के व्यवहार बँकेमार्फ त अथवा रोख पैशाने होतात. परंतु गेल्या तीन दिवसांत नागरिकांना बँकांतून पैसेच काढता आले नाही. तर बºयाच एटीएममध्ये केवळ २००० हजार रुपयांच्या नोटा असल्याने नागरिकांना त्यापेक्षा कमी रक्कम काढता आली नाही. तर बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला.