डेंग्यू, चिकनगुणिया आजाराची नागरिकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:59+5:302021-06-18T04:10:59+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक कोरोना महामारी या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांना आपले घरचेदेखील गमवावे लागले असून, ...

Citizens fear dengue, chikungunya disease | डेंग्यू, चिकनगुणिया आजाराची नागरिकांना भीती

डेंग्यू, चिकनगुणिया आजाराची नागरिकांना भीती

Next

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक कोरोना महामारी या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांना आपले घरचेदेखील गमवावे लागले असून, यातून सावरत नाही तोच चिकनगुणिया व डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आहे. अंबड, दातीर मळा, चुंचाळे शिवार यासह परिसरातील अनेक भागात चिकनगुणिया सदृश आजाराचे असंख्य रुग्ण आढळले आहेत. अनेकांना ताप येणे तसेच हात-पाय दुखणे, अशक्तपणा येणे, सांधेदुखी असे त्रास होत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलत योग्य ती दखल घेऊन या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

--कोट---

दातीर मळा, चुंचाळे शिवार, अंबड यासह परिसरात डेंग्यू तसेच चिकनगुणिया सदृश आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहे. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेने याबाबत योग्य ती दखल घेऊन या भागात लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडणार.

रामदास दतीर, सिडको विभाग अध्यक्ष, मनसे.

Web Title: Citizens fear dengue, chikungunya disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.