चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

By admin | Published: December 19, 2014 11:11 PM2014-12-19T23:11:44+5:302014-12-19T23:45:00+5:30

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

Citizens frightened due to theft incidents | चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट

Next

दिंडोरी : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, दिंडोरीतील राजेश्वरी गल्लीत बंद घराची चोरट्यांनी घरफोडी करत टीव्ही पितळी भांड्यासह पंचवीस हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. शहरात विजयनगर ग्रीनसिटी परिसरात दोन तीन घरफोड्या करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले होते, तर सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास मडकीजाम शिवारात धुमणे वस्तीवर दहा-बारा चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसर पिंजून काढला होता; मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले असून, चोरी व दरोड्याचा तपास सुरु आहे. या घटनानंतर पोलिसांनी शहर परिसरात गस्त वाढवली असतानाही पुन्हा गुरुवारी रात्री घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे मनोज कर्पे यांच्या घराचे कुलूप तोडत घरातील टीव्ही व पितळाचे मोठे पातेले आदि भांडे चोरून नेले.(वार्ताहर)

दिंडोरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार पाहता पोलिस बळ अपुरे ठरत असून पोलिसांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अिस मागणी नागरिकांनी केली आहे

Web Title: Citizens frightened due to theft incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.