सलग चौथ्या दिवशी लसीकरण नसल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:46+5:302021-07-04T04:10:46+5:30

--------------------- चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार चांदवड : चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने चांदवड ...

Citizens harassed for lack of vaccination for fourth day in a row | सलग चौथ्या दिवशी लसीकरण नसल्याने नागरिक हैराण

सलग चौथ्या दिवशी लसीकरण नसल्याने नागरिक हैराण

Next

---------------------

चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार

चांदवड : चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व परिचारिका यांना शुभेच्छा देऊन त्यांना सन्मानपत्र दिली, तर कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार केला, तर चांदवड शहरातील सर्व डॉक्टरांना सन्मानपत्र दिले. यावेळी डॉ.सुशीलकुमार शिंदे, डॉ.फैज्जल, डॉ.पालवी, डॉ.निकम, डॉ.पवार व सर्व डॉक्टर यांचा सत्कार शिवसेना जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर, केशव ठाकरे, प्रसाद प्रजापत, गुड्डू खैरनार, घमाजी सोनवणे आदीसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

(०३ एमएमजी २)

चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व परिचारक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करताना, नितीन आहेर, विलास भवर, केशव ठाकरे, प्रसाद प्रजापत, गुड्डू खैरणार, घमाजी सोनवणे आदी.

---------------------------------------------

पंचायत समितीत कृषी दिन साजरा

चांदवड : येथील पंचायत समिती सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणून कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव, गटविकास अधिकारी महेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी वाघ, विश्वनाथ ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आदिवासी गटात पीकविमा स्पर्धेत ज्या व्यक्तीने जास्त पीकविमा मिळविला. त्यांचा सत्कार व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Citizens harassed for lack of vaccination for fourth day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.