प्रवेशद्वाराच्या प्रस्तावित नावाला नागरिकांची हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:56+5:302021-04-09T04:14:56+5:30
पिंपळगाव बहुला शिवारात महानगरपालिकेच्या निधीतून नवीन शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. सदर शाळेचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. मात्र, शाळेच्या ...
पिंपळगाव बहुला शिवारात महानगरपालिकेच्या निधीतून नवीन शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. सदर शाळेचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. मात्र, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण कै. अनुसया आई धर्माजी पाटील म्हणून करण्याबाबत महासभेत प्रस्तावित केले असून, या नामकरणास हरकत असल्याचे पत्र सविता करण गायकर यांनी मनपा शहर अभियंत्यांना दिले आहे. प्रभागात सर्व जाती, धर्मांचे लोक एकोप्याने राहत असून, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीच्या नावाने करण्यात येऊ नये. सद्य:स्थितीत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे नाव दिलेले आहे, तसेच उर्वरित राहिलेल्या एका प्रवेशद्वाराला हेच नाव कायम ठेवण्यात यावे किंवा थोर महापुरुषांचे नाव देण्यात यावे. सदर प्रस्तावित नाव देण्याबाबतच्या हरकत सुनावणीस आम्हाला बोलविल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये. लोकप्रतिनिधींच्या दबावात निर्णय घेतल्यास आपण जबाबदार राहाल, असेही निवेदनात म्हटले आहे. माजी नगरसेवक सदाशिव माळी, सविता करण गायकर, महेश आहेर, कल्पेश कांडेकर आदींनी शहर अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
(फोटो ०८ फलक)