त्र्यंबकला रस्ते, गटारीच्या कामांना नागरिकांची हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:43 PM2019-12-18T12:43:13+5:302019-12-18T12:43:20+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील गट क्र. २९२ मधील तलाठी कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामे करण्यात आली आहेत. तथापि करण्यात आलेले रस्ते व गटारी या ले आउट प्रमाणे होत नसून अंदाजे गटारी आणि रस्ते केले जात असल्याने या परिसरातील रहिवास्यांनी याबाबत हरकत घेतली असून लेआउट प्रमाणेच रस्ते व्हावे अशी मागणी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत मुख्यधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, निरंजनी आखाड्यासमोरील तलाठी कॉलनी गट नंबर २९२ परिसरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने सिमेंट काँक्र ीट रस्ते व गटार बांधकाम करण्याचे काम चालू केले आहे. तथापि सुरू असलेले काम हे अंदाजित असून लेआउट प्रमाणे रस्ते होत नाहीत. जेथे जागा मिळेल तेथे रस्ता तयार केला जात आहे.याबाबत या अगोदरही नागरिकांनी लेआउट प्रमाणे रस्ते व्हावेत अशी हरकत घेतली होती. एवढ्यावरच न थांबता नगर परिषदेस निवेदन देखील सादर केले आहे. परंतु नगर परिषदेने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असून पुन्हा एकदा नगर परिषदेला याबाबत निवेदन दिले आहे. सदर रस्ते व गटारी ले आऊट प्रमाणे कराव्यात तसेच या परिसरात पाणी साचत असल्याने रस्त्याच्या ठिकाणी खोदाई करु न काम करावे अशी मागणी होत आहे. (१७ टीबीके १)