पवार वस्तीतील नागरीक करतात पाण्यातुन रोज जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 06:50 PM2019-08-19T18:50:24+5:302019-08-19T18:52:14+5:30
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील रवळजी येथील मोठीदरी ते पवार वस्ती येथे पाझरतलाव असुन तो पुर्ण भरल्याने परीसरातील सुमारे १५० ते २०० नागरीकांना दोरच्या सहाय्याने जिव मुठीत धरून ८ दिवसांपासुन प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

पवार वस्तीत सुमारे २०० नागरीक राहत असुन पाझर तलाव भरल्याने तसेच वहीवाटीसाठी दुसरा रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे गरोदर महिला, आजारी रु ग्णांना वेळीस उपचार न मिळाल्याने रु ग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील नागरीकांनी सांगितले.
या बाबतीत नविन पुल बांधण्यासाठी जिल्हा परीषद, स्थानिक आमदार व खासदार यांना वेळोवेळी प्रस्ताव दिला परंतु आजपावेतो कोणीच दखल घेतलेली नाही. प्रशासनाने त्वरीत दखल घेण्याची मागणी येथील बबलू वाघ, नानानी पवार, रामदास पवार, अनिल बहीरम, मधुकर बहीरम, जिभाऊ चौरे, गंगाधर पवार, एकनाथ पवार, बुधा पालवी, भाऊसाहेब पवार, प्रल्हाद पवार, नामदेव पालवी, दादाजी बहीरम, केवळ भालेराव, अशोक चौरे आदींनी केली आहे.
आम्ही कायम पावसाळ्यातील दिवसांमध्ये जिव मुठीत घेऊन प्रवास करत असतो. याबाबत खासदार, आमदार तसेच जिल्हा परीषद यांना वेळोवेळी नवीन पुल बांधण्यासाठी लेखी व तोंडी सांगुन ही प्रशासन तसेच राजकीय पुढारी दखल घेत नाही, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर संपुर्ण ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहोत.
बाबुलाल चौरे, ग्रामस्थ, पाळे खुर्द.