मानोरा उभारण्यास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 03:22 PM2020-03-16T15:22:54+5:302020-03-16T15:23:34+5:30

सटाणा:शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात अनिधकृतपणे सुरु असलेल्या मोबाईल कंपनीच्या मानोरा उभारणीच्या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पालिका प्रशासनाने ...

 Citizens protest against building a manorah | मानोरा उभारण्यास नागरिकांचा विरोध

मानोरा उभारण्यास नागरिकांचा विरोध

Next
ठळक मुद्दे सटाणा:मोबाईल कंपनीला प्रशासनाची नोटीस


सटाणा:शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात अनिधकृतपणे सुरु असलेल्या मोबाईल कंपनीच्या मानोरा उभारणीच्या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ काम बंद पाडून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील प्रभात क्र मांक सात व आठ मधील महालक्ष्मी मंदिर परिसरातील संजय जाधव यांच्या घरावर अनिधकृतपणे मोबाईल मानोरा उभारणीचे काम सुरु आहे. या कामाला येथील नागरिकांनी हरकत घेतली आहे. नागरिकांनी वेळोवेळी या अनिधकृत काम बंद करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र तक्र ार करूनही याकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे काम केले जात आहे. पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून साहित्य जप्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे. निवेदनावर मुक्ता वरोडे, प्रणिता पाठक, प्रीती पाठक, देवेंद्र जाधव,, श्रीराम अमृतकर, प्रकाश अमृतकर, पूनम अमृतकर, दिलीप खैरनार, मंगल कायस्थ, जैनब बोहरी, भास्कर बागडाने, राजेंद्र सोनवणे, योगिता जाधव, संगीता मैंद, सुरेखा पवार, प्रभाकर केल्हे, मंगला रौदळ, दीपाली घोडके, चेतना पाठक, सरला शिरोडे, गीतकुमार जाधव, कल्पना शिरोडे यांच्या सह्या आहेत.
@शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात मोबाईल मोनोº्याच्या सुरु असलेल्या कामासंदर्भात लेखी तक्र ारी आल्या असून त्यानुसार संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. काम न थांबवल्यास तात्काळ त्याच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.
हेमलता डगळे-हिले, मुख्य अधिकारी b

Web Title:  Citizens protest against building a manorah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.