प्रतिबंधित क्षेत्रातील नागरीकांच्या कोरोना चाचणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:52+5:302021-04-08T04:15:52+5:30
नाशिक- कोरोना रोखण्यासाठी बाधीतांच्या परीसरात आखलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची काटेकोर अंमलबजावणी करतानाच स्थानिक रहीवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार ...
नाशिक- कोरोना रोखण्यासाठी बाधीतांच्या परीसरात आखलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची काटेकोर अंमलबजावणी करतानाच स्थानिक रहीवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी नागरिकांना भाजीपाला, दूध आणि तत्सम जीवनावश्यक वस्तु वेळेत मिळतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मनपा व पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत त्याठिकाणी छोटे व मोठे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. मनपा आयुक्त जाधव व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केली. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तसेच या ठिकाणी काम करीत असलेल्या असणाऱ्या एन.एम.ए , आशा सेविका, वैद्यकीय पथक व पोलिस पथकाशी चर्चा केली. या ठिकाणी असणारे रुग्ण व परिसरात रहिवाशांची अँटीजेन व आर.टी. पी.सी.आर.ची रुग्णांची तपासणी बाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या चाचण्या वाढविणे,होम आयसोलेशन फॉर्म भरून घेणे,प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरातील फलकावर संपर्क क्रमांक, प्रतिबंधित क्षेत्राचा प्लॅन आदि माहीती लावण्याच्या व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त जाधव यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आयुक्तव्दयींनी गोविंद नगर, निसर्ग कॉलनी, पाथर्डी फाटा, पाथर्डी फाटा, सातपूर विभागातील सप्तशृंगी अपार्टमेंट नवजीवन हॉस्पिटल शेजारी जाधव संकुल अशोकनगर,नाशिक पश्चिम विभागात चैतन्य नगर,गोंदवेलकर महाराज मंदिराजवळ, नाशिकरोड विभागातील अयोध्या नगरी व हार्मोनी बिल्डिंग, उपनगर,वसंत दीप सोसायटी जेलरोड, पंचवटीतील महाराष्ट्र कॉलनी हिरावाडी रोड पंचवटी,येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे,मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी,करुणा डहाळे,निवासी उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, कोरोना कक्ष प्रमुख आवेश पलोड,डॉ.विजय देवकर आदी अधिकारी उपस्थित होते.