सिडकोत दुसऱ्या दिवशीही नागरिक माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:56+5:302021-05-01T04:13:56+5:30

महापालिकेच्या जुने सिडको येथील केंद्रावर गुरुवारी सर्व्हर डाऊन झाल्याने रांगा लावण्यात आलेल्या व टोकन दिलेल्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी ...

Citizens return to CIDCO on second day | सिडकोत दुसऱ्या दिवशीही नागरिक माघारी

सिडकोत दुसऱ्या दिवशीही नागरिक माघारी

Next

महापालिकेच्या जुने सिडको येथील केंद्रावर गुरुवारी सर्व्हर डाऊन झाल्याने रांगा लावण्यात आलेल्या व टोकन दिलेल्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी लस देण्यासाठी बोलावण्यात आले होते. यामुळे शुक्रवारी पुन्हा नव्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने माघारी फिरावे लागले. विशेष म्हणजे ज्या नागरिकांना लस घेण्यासाठी टोकन दिले होते यातील फक्त ५० नागरिकांनाच लस देण्यात आली. या केंद्रावर दररोज सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु केवळ लस उपलब्ध होत नसल्याने केवळ ५० नागरिकांना लस देण्यात आली. यामुळे ज्या नागरिकांना लस घेता आली नाही अशांनी शासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेगडेवार चौक येथील मनपाच्या केंद्रावर शुक्रवारी पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनी लस घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या, परंतु शुक्रवारी या केंद्रावर लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

कोट===

सिडकोसह परिसरातील सर्वच नागरिकांना लस देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु वरिष्ठांकडून लसचा पुरवठा जितका केला जातो तेवढीच लोकांना लस देण्यात येते. परंतु यापुढील काळात जास्तीत जास्त नागरिकांना देण्यासाठी लसीचा साठा उपलब्ध करणार

-प्राजक्ता कडवे, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Citizens return to CIDCO on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.