उमराणेत लस न घेताच नागरिक माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 05:03 PM2021-07-13T17:03:10+5:302021-07-13T17:04:36+5:30

उमराणे : आरोग्य विभागामार्फत देवळा तालुक्यात पाच केंद्रावर कोविडची कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमराणे येथे ५०० लस उपलब्ध करुन देण्यात होत्या. परंतु गावाची लोकसंख्या बघता उपलब्ध झालेल्या लसी अवघ्या एक ते दोन तासातच बुकींग झाल्याने उशिरा आलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. लस वाटपासंदर्भात नियोजनाचा अभाव आढळून आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Citizens return without getting vaccinated in Umrana | उमराणेत लस न घेताच नागरिक माघारी

उमराणे येथे कोवॅक्सिन लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी केलली गर्दी.

Next
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव: लसीकरणासाठी नागरिकांची गर्द

उमराणे : आरोग्य विभागामार्फत देवळा तालुक्यात पाच केंद्रावर कोविडची कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमराणे येथे ५०० लस उपलब्ध करुन देण्यात होत्या. परंतु गावाची लोकसंख्या बघता उपलब्ध झालेल्या लसी अवघ्या एक ते दोन तासातच बुकींग झाल्याने उशिरा आलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. लस वाटपासंदर्भात नियोजनाचा अभाव आढळून आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोवॅक्सिन लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. त्या अनुषंगाने मंगळवार ( दि.१३) रोजी देवळा येथे ३००, लोहोणेर २००, खामखेडा २५०, वासोळ ५०० व उमराणे येथे ५०० कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. दरम्यान उमराणे येथे गावाची लोकसंख्या लक्षात घेता ५०० लस अपुऱ्या पडत असल्याने लस मिळविण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

परिणामी अवघ्या एक ते दोन तासातच लसीकरणाचे टोकन पुर्ण झाले. त्यानंर लस घेण्यास उशिर झालेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली असुन लस वाटपासंदर्भात नियोजनाचा अभाव आढळून आल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले.

दरम्यान आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्रात नागरिकांनी गर्दी व गोंधळ करु नये तसेच सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहावे असे आवाहन केले होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सामाजिक अंंतर ठेवण्यास नागरिकांना जणू विसरच पडल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Citizens return without getting vaccinated in Umrana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.