उमराणेत लस न घेताच नागरिक माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:11+5:302021-07-14T04:17:11+5:30
उमराणे : आरोग्य विभागामार्फत देवळा तालुक्यात पाच केंद्रांवर कोविडची काेव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने ...
उमराणे : आरोग्य विभागामार्फत देवळा तालुक्यात पाच केंद्रांवर कोविडची काेव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमराणे येथे ५०० लस उपलब्ध करून देण्यात येत होत्या. परंतु गावाची लोकसंख्या बघता उपलब्ध झालेल्या लसी अवघ्या एक ते दोन तासातच बुकिंग झाल्याने उशिरा आलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. लस वाटपासंदर्भात नियोजनाचा अभाव आढळून आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत काेव्हॅक्सिन लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी ( दि.१३) देवळा येथे ३००, लोहोणेर २००, खामखेडा २५०, वासोळ ५०० व उमराणे येथे ५०० काेव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, उमराणे येथे गावाची लोकसंख्या लक्षात घेता ५०० लस अपुऱ्या पडत असल्याने लस मिळविण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. परिणामी अवघ्या एक ते दोन तासातच लसीकरणाचे टोकन पूर्ण झाले. त्यानंतर लस घेण्यास उशीर झालेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली असून, लस वाटपासंदर्भात नियोजनाचा अभाव आढळून आल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. दरम्यान, आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्रात नागरिकांनी गर्दी व गोंधळ करू नये तसेच सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहावे, असे आवाहन केले होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सामाजिक अंंतर ठेवण्यास नागरिकांना जणू विसरच पडल्याचे चित्र दिसून आले.
----------------------
उमराणे येथे काेव्हॅॅक्सिन लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी केेेलेली गर्दी. (१३ उमराणे)
130721\13nsk_15_13072021_13.jpg
१३ उमराणे