नागरिकांनी आरोग्याची काळज घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:44 PM2020-08-22T17:44:03+5:302020-08-22T17:45:38+5:30

पेठ -कोरोना साथरोग संदर्भात करावयाच्या प्रशासकिय उपाययोजना व विविध विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय विभाग प्रमूखांची आढावा बैठक घेण्यात आली.

Citizens should take care of their health | नागरिकांनी आरोग्याची काळज घ्यावी

पेठ येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसीलदार संदिप भोसले, नम्रता जगताप, रामेश्वर गाडे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देसुरज मांढरे : पेठ तालुक्यात आढावा बैठक, कोरोनासह प्रशासकिय कामकाजावर चर्चा

पेठ -कोरोना साथरोग संदर्भात करावयाच्या प्रशासकिय उपाययोजना व विविध विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय विभाग प्रमूखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोवीड केअर सेंटर, कोरोना प्रशासकिय उपाययोजना, खरीप हंगामातील पिक परिस्थिती, पीक कर्ज वाटप, खते वाटप, आरोग्य विषयक सुविधा, धान्य वितरण व्यवस्थेसह सर्व शासकिय विभागांचा आढावा घेतला. तहसील कार्यालयात गोष्टरूप व्यवहार निती फलकाचे अनावरण मांढरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसीलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.मोतीलाल पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र वराडे, सुदेश निरगुडे, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, सहायक उपनिबंधक राजीव इप्पर यांचेसह तालुक्यातील विभागप्रमूख उपस्थित होते.

 

Web Title: Citizens should take care of their health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.