दुसऱ्या दिवशी नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:26 PM2020-03-23T21:26:56+5:302020-03-24T00:16:10+5:30

मालेगाव : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी (दि. २३) दुसºया दिवशीही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. परंतु सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली, तर पुन्हा ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन होण्याच्या भीतीने शहरवासीयांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली.

Citizens on the street the next day | दुसऱ्या दिवशी नागरिक रस्त्यावर

दुसऱ्या दिवशी नागरिक रस्त्यावर

Next
ठळक मुद्देमालेगाव : अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी (दि. २३) दुसºया दिवशीही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. परंतु सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली, तर पुन्हा ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन होण्याच्या भीतीने शहरवासीयांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली.
कॅम्पातील सोमवार बाजारात पेट्रोलपंपावर रांग लावली होती. सोमवार बाजारसह बाजार समितीतील दुकाने आजही बंद होती. शहरवासीयांकडून औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर मास्क खरेदीसाठी होणारी गर्दी पाहून मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांकडून त्याचा गैरफायदा घेत चढ्या दराने मास्क आणि हॅण्डग्लोजची विक्री होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवाशांची वर्दळ असणाºया शहरात प्रथमच अघोषित संचारबंदीचे वातावरण असल्याने आणि बसेसही बंद असल्याने तालुक्यासह बाहेरगावहून कुणी प्रवासी शहरात येऊ शकला नाही.

Web Title: Citizens on the street the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.