घोटीत वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:49 PM2020-10-12T15:49:38+5:302020-10-12T16:01:11+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्व. मुळचंदभाई गोठी मार्ग ते किनारा हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घोटी पोलीस स्टेशनची डोळेझाक होत आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्व. मुळचंदभाई गोठी मार्ग ते किनारा हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घोटी पोलीस स्टेशनची डोळेझाक होत आहे.
कोरोनाचा प्रभाव घोटीत मोठया प्रमाणात वाढत असल्याने शहर गेल्या महिन्याभरापासून गर्दी रोखण्यासाठी २ वाजेनंतर बंद ठेवण्यात आले होते. परंतु रविवारपासून घोटी बाजारपेठ पुर्णपणे उघडण्यात आल्यामुळे अनलॉक झाल्यापासून घोटीत होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत असलेली गर्दी कोरोनाच्या संकटाला आमंत्रण देत असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास तालुक्यात घोटी कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ शकतो.
घोटी शहरातील बँकाबाहेर तासंतास होणाऱ्या गर्दीचे नियोजन बॅँकेचे आहे, परंतु बँकेकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नसल्याने ग्रामीण भागातून येणाºया वृद्ध पेन्शनर्स यांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच शहरातील रस्त्यावर दुचाकी लावणाºयावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जैन मंदिर, वासुदेव चौक, भंडारदरा रोड, स्टेट बँक, मायाबाजार ही गर्दीची ठिकाणे असून या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आणि वाहतुकीला होणारा अडथळा व दैनंदिनी वाद रोखावे अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.
सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरात व्यापाराकरिता येणाºया नागरिकांची संख्या कमी झाली आहे. शहरातील व्यापारी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यापार करतात. परंतु वाहतुकीचे नियोजन नसल्याने व्यापाºयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून मार्ग सुकर करावा.
- विक्र म मुनोत, कापड व्यावसायिक.