नागरिकांकडून तीन लाखांचा दंड वसूल कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:42 AM2018-04-11T00:42:24+5:302018-04-11T00:42:24+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून परिसरातील सोसायटी, व्यावसायिक, हॉटेल्स आदी विक्रेत्यांना सूचनापत्र व नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत ओला-सुका कचरा याचे वर्गीकरण न करणाºया १८७ जणांवर मनपाने दंडात्मक कारवाई करून एक लाख ७२ हजाराचा दंड वसूल केला आहे.
राज्य शासनाने प्लॅस्टिक, थर्माकोल विक्री व वापर याच्यावर बंदी घातली आहे. कुठल्याच प्रकारचे प्लॅस्टिक, पिशवी व थर्माकोलचा वापर करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. नाशिकरोड परिसरामध्ये मनपा आरोग्य विभागाकडून १९ व्यावसायिकांवर कारवाई करत ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, अनेकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.