जुन्या वीज वाहीनीमुळे टाकेद परिसरात नागरीक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 08:04 PM2019-07-30T20:04:29+5:302019-07-30T20:05:20+5:30
सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.
सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.
तीस ते चाळीस वर्षा पुर्वी भंडारदरा येथे तयार केलेली जल विद्युत बोरटेंभा (ईगतपुरी) येथील सब स्टेशनमध्ये वाहून आणण्यासाठी तेहतीस के. व्ही. विद्युत वाहीनी टाकलेली आहे. या वेळी १९८८ ते १९९० च्या दरम्यान परदेशवाडी येथे तालुक्याच्या पुर्व भागासाठी तेहतीस के. व्ही. उपकेंद्र सुरू केले. या उप केंद्रासाठी याच वाहीनीवरून विद्युत पुरवठा करण्यात आला.
सदरची वाहीनी वैतारणा वाहीनीसाठी फायद्याची व्हावी म्हणून खंबाळे परीसरातून ही वाहीनी घेण्यात आली. यामुळे कुठेही दोष निर्माण झाल्यास बागायती शेती, दारणा नदीचे विस्तीर्ण पात्र या मुळे रात्री अपरात्री वाहीनीतील दोष काढण्यासाठी खुप त्रास होत असतो. त्यामध्ये जुनाट लोखंडी पोल, जुनाट विजवाहक तारा, खराब झालेले स्टे, चिनमातीच्या चिमण्या ह्या वारंवार खराब होत आहेत. काही तुटत आहेत. यामुळे कायम परदेशवाडी उप केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होत असतो.
चार फीडर पैकी टाकेद फिडर वरील विद्युत वाहीनी ही सुमारे सत्तर कि. मी. लांबीची या परिसरात पसरलेली आहे. या फिडरचा लोड ही १९० पर्यंत जात असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त तर असतेच पण या वाहीनीवर ७६ जनित्र आहेत. यामध्ये अधरवड, टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक, अडसरे बुद्रुक व खुर्द व त्यांच्या वाड्या अशा सुमारे वीस गाव व वाड्यांचा समावेश आहे.
या सर्व बाबींचा विचार करून टाकेद ते परदेशवाडी ही स्वतंत्र विद्युत वाहीनी टाकण्याची सतत मागणी होत आहे. या मुळे विद्युत दाबाचे नियंत्रण ही होईल. या बाबतचा सात कि. मी. अंतराचा स्वतंत्र वाहीनीचा प्रस्ताव घोटी ग्रामीण विभागाने पाठविल्याचे समजते. याबाबत लोकप्रतिनिधींनी योग्य तो पाठपुरवठा करावा अशी ग्रामस्थ करीत आहेत.