कनेक्टीवीटी मिळत नसल्याने आदिवासी भागातील नागरीक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:38 PM2020-10-05T22:38:42+5:302020-10-06T01:11:07+5:30
नाशिक : साहेब पोरांना अभ्यास करण्यासाठी कौलावर चढवायचे का ? असा प्रश्न आदिवासी भागातील नागरीक विविध मोबाईल कंपण्यांच्या अधिका?्यांना विचारु लागले आहेत. कंपण्यांकडून मात्र त्यांना उडवा उडिवची उत्तर दिली जात असल्याने या कंपण्यांच्या कारभाराबाबत आदिवासी भागात संताप व्यक्त केला जात आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळी, कोटंबी या गावांसह परीसरात कोणत्याही मोबाईल कंपणीच्या नेटवकर्ची कनेटीव्हीटी मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे सध्या शाळा, महािवद्यालय बंद आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी आॅनलाईन वर्ग घेतले जात आहेत मात्र विद्याथ्यांना मोबाईल कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून या परीसरात दुरध्वनी सेवा विस्कळीत झाली असल्याने त्रस्त झालेले वनराज फुड प्रोसेसिग शेतकरी कंपनीचे यशवंत गावंडे यांनी कंपणीच्या अधिका?्यांना मुलांना आता घराच्या कौलाववर चढवायचे का असा सवाल केला आहे. कंपण्यांकडून वेगवेगळी कारण देउन वेळ मारुन नेली जात आहे. विशेष म्हणजे एका कंपणीचे नेटवर्क चालत नाही म्हणून परीसरातील बहुसंख्य ग्राहकांनी दुस?्या कंपनीचे कनेक्शन घेतले पण त्याचीही तीच स्थिती असल्यामुळे नागरीकांमध्ये मोबाईल कंपण्यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून याविरुूध्द आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.