सटाण्यात भर दिवसा घरफोडीने नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:10 PM2020-03-04T23:10:55+5:302020-03-04T23:11:27+5:30

सटाणा : शहरातील शिवाजीनगरातील लोकप्रतिनिधी असलेल्या महिलेच्या घरी भर दिवसा झालेल्या घरफोडीने नागरिक भयभीत झाले आहेत.

Citizens were scared by the burglary throughout the day | सटाण्यात भर दिवसा घरफोडीने नागरिक भयभीत

सटाण्यात भर दिवसा घरफोडीने नागरिक भयभीत

Next
ठळक मुद्देकपाट तोडून १ लाख ३५ हजार रूपयांची रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शहरातील शिवाजीनगरातील लोकप्रतिनिधी असलेल्या महिलेच्या घरी भर दिवसा झालेल्या घरफोडीने नागरिक भयभीत झाले आहेत.
भाक्षी रोडवरील पोलीस स्टेशनपासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजीनगरात राहणारे ठेकेदार कोमल (नाना) मोरकर व नरसेवक सुनीता मोरकर हे दोघे पती- पत्नी राहतात तर मुले शिक्षणानिमित्त नाशिक येथे असतात.
दुपारी १ वाजेच्या सुमारास नाना मोरकर जेवणासाठी घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस कर्मचारी रवींद्र कोकणी, संतोष भगरे करीत आहेत.दीड लाख लंपासनगरसेवक मोरकर या सकाळी आठ वाजता शेतात गेल्या, तर नाना मोरकर खासगी इमारतीच्या ठेका घेतलेल्या कामांवर निघून गेले. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. लाकडी कपाट तोडून १ लाख ३५ हजार रूपयांची रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.

Web Title: Citizens were scared by the burglary throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.