पंचवटीत लस शिल्लक नसल्याने नागरिक माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:43+5:302021-05-19T04:14:43+5:30

मंगळवारच्या दिवशी पंचवटीत केवळ इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य कुठल्याही लसीकरण केंद्रावर लस शिल्लक नसल्याने नागरिकांना लस न घेताच ...

Citizens withdraw due to lack of vaccine in Panchavati | पंचवटीत लस शिल्लक नसल्याने नागरिक माघारी

पंचवटीत लस शिल्लक नसल्याने नागरिक माघारी

Next

मंगळवारच्या दिवशी पंचवटीत केवळ इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य कुठल्याही लसीकरण केंद्रावर लस शिल्लक नसल्याने नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले.

पंचवटी इंदिरा गांधी रुग्णालय, रेडक्रॉस, कालिका नगर, नांदूर, मखमलाबाद दवाखाना, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मंगळवारच्या दिवशी इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य सर्व लसीकरण केंद्रांवर लस शिल्लक नसल्याने नागरिकांना केंद्रावरून लस न घेताच माघारी परतावे लागले. प्रशासनाकडून ऐनवेळी लस नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लस घेण्यासाठी नागरिकांच्या गर्दीने भरगच्च होणारे लसीकरण केंद्रावर मंगळवारी लस नसल्या कारणाने शुकशुकाट पसरला होता. इंदिरा गांधी रुग्णालयात दुसरा डोस देण्याचे काम सुरू होते. सकाळी लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रथम चाचणी करण्यात येऊन ३०० नागरिकांना टोकण वाटप करण्यात आले होते.

Web Title: Citizens withdraw due to lack of vaccine in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.