सीटू संलग्न कर्मचारी संघटनेची निदर्शने
By admin | Published: June 21, 2017 01:26 AM2017-06-21T01:26:59+5:302017-06-21T01:27:31+5:30
सीटू संलग्न कर्मचारी संघटनेची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीटू संलग्न कामगार-कर्मचारी संघटनेने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या उपाध्यक्ष अॅड. वसुधा कराड व माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातवा वेतन आयोग लागू करावा, महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करत त्यावर तातडीने कार्यवाही करावी, सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी, अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना सुधारित तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, विविध संवर्गातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरावी, निवडणूक कालावधीतील जादा कामाचा मोबदला रोखीने अदा करावा, सेवानिवृत्त व वैद्यकीयदृष्ट्या अनफीट सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वाने कामावर घ्यावे यांसह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
यावेळी जगदीश देशमुख, रावसाहेब रुपवते, संतोष आगलावे, संजय जगताप, अनिल गोसावी, दीपक लांडगे, अजय सौदागर, सुनील राठोड, अजय खळगे, जगदीश अहिरे, संतोष भालेराव, अंबादास खेताडे आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.