शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट
By admin | Published: March 6, 2017 01:18 AM2017-03-06T01:18:29+5:302017-03-06T01:18:47+5:30
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़ सोनसाखळी चोरीच्या दोन घटना भाभानगर तर एक घटना उपनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़
भाभानगर परिसरातील रहिवासी पूनम सोनवणे या शुक्रवारी (दि़३) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३़४ तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याच दरम्यान पायी जाणाऱ्या कस्तुरबाई पारख यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी खेचून नेली़
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोडजवळील दत्तमंदिर रोड परिसरातून शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सुमन रणशिंगे (रा. दत्तमंदिररोड, देवळालीगाव) या वृद्धा घराकडे पायी जात होत्या.
रजा कॉलनीसमोरून रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी रणशिंगे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)