शहरात २१.७ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:18 AM2019-07-31T01:18:32+5:302019-07-31T01:18:42+5:30
शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.
नाशिक : शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.
सोमवारपासून शहरात वाऱ्याचा वेगही वाढला असून, सोसाट्याच्या वाºयासह सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीशी हुडहुडीदेखील जाणवू लागली आहे. गेल्या गुरुवारपासून शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, गुरुवारी १५.४ मिमीपर्यंत पाऊस पडला होता.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १५.८ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. जून महिन्यात पावसाची स्थिती समाधानकारक नव्हती, मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दमदार
‘कम बॅक’ केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. पावसाची संततधार सुरु असली तरी जनजीवन मात्र सुरळीत सुरु होते. कुठेही पावासाचा व्यत्य आला नाही.
गंगापूरची साठवण क्षमता साडेपाच टीएमसी
गंगापूर धरणाची ५ हजार ६४० दशलक्ष घनफूट अर्थात साडेपाच टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे. धरणाचा जलसाठा सध्या ४ हजार ७५८ दशलक्ष घनफूट इतका झाला असून, ८४.७८ टक्के धरण भरले आहे. गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.