शहरात पुन्हा मुसळधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:04 AM2017-10-09T00:04:24+5:302017-10-09T00:04:52+5:30

नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘दम’धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. अशा स्थितीत कोळशाचा निर्माण झालेला तुटवडा परिणामी वीज उत्पादनात झालेल्या घटमुळे होणाºया आपत्कालीन भारनियमनाचा ‘झटका’ नागरिकांना सहन करावा लागत आहे. रविवारी (दि.८) दुपारपासून उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणची ‘बत्ती गूल’ झाली.

 City again | शहरात पुन्हा मुसळधार!

शहरात पुन्हा मुसळधार!

Next

नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘दम’धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. अशा स्थितीत कोळशाचा निर्माण झालेला तुटवडा परिणामी वीज उत्पादनात झालेल्या घटमुळे होणाºया आपत्कालीन भारनियमनाचा ‘झटका’ नागरिकांना सहन करावा लागत आहे. रविवारी (दि.८) दुपारपासून उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणची ‘बत्ती गूल’ झाली.
रविवारी दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबई नाक्यापासून पुढे शहराच्या मध्यवर्ती भागात संध्याकाळी साडेसहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली; तत्पूर्वी देवळाली कॅम्प, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, आंबेडकरनगर, अशोकामार्ग आदी भागात पावसाने सलामी दिली होती. संध्याकाळी मुंबई नाका, सीबीएस, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, सातपूर, सिडको, पंचवटी, जुने नाशिक आदी परिसराला पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धा तास या भागात पाऊस सुरू होता.
त्यानंतर उघडीपही अल्पवेळ होती, पुन्हा सव्वा सात वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले. गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड आदी परिसराचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. अशोकामार्ग, वडाळागाव परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आवक वाढली

शहरासह ग्रामीण भागामध्येही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पाण्याची आवक वाढली. यामुळे रविवारी सकाळपासून सुरू असलेला तीनशे क्यूसेकचा विसर्ग संध्याकाळी सहा वाजता वाढविण्यात आला होता. गोदापात्रात एकूण सहाशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू होता. धरण शंभर टक्के भरले असून जलसाठा पाच हजार ६३० दलघफू इतका आहे. गंगापूर समूहातील गौतमी, काश्यपी, आळंदी ही लहान धरणेही शंभर टक्के भरली आहेत.

२४ तासांत १५.९ मि.मी.

शनिवारी (दि.७) दुपारी साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी पंधरा मिनिटांत ९.० मि.मी. इतका उच्चांकी पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे. रात्री आठ वाजता पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली तेव्हा ४५ मिनिटांत ४.७ इतका पाऊस झाला. रविवारी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत २४ तासांत १५.९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळपर्यंत १०.३ मि.मी. इतका पाऊस पडला होता. रविवारी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत ७.० मि.मी. इतका पाऊस झाला.

Web Title:  City again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.