शहर व परिसरात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:45 AM2019-07-28T00:45:54+5:302019-07-28T00:46:22+5:30

शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.

 City and locality throughout the day | शहर व परिसरात दिवसभर संततधार

शहर व परिसरात दिवसभर संततधार

googlenewsNext

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.
शहर व परिसरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरींचा संततधार वर्षावाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. घाटक्षेत्रांमधील परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी व सोमवारी जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या तालुक्यांत मुसळधार तर शहरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार शहरात दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होत होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.६ मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राकडून देण्यात आली.
सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होता, मात्र सकाळी ८.३० वाजेपासून पावसाचा जोर वाढला. मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होऊ लागल्याने तीन तासांत ७.४ मि.मी. पाऊस झाला. दिवसभरात हा ‘स्पेल’ वगळता पावसाचे प्रमाण कमी राहिले. ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पावसाने जवळपास उघडीप दिली होती. या कालावधीत शहरात केवळ २.६ मि.मी. पाऊस झाला. दुपारनंतर पुन्हा जोर वाढल्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५.६ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.
गंगापूर धरण ७२ टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात ३०६ मि.मी.
गंगापूर धरणाचा जलसाठा ७२ टक्क्यांवर शनिवारी सायंकाळी पोहोचला होता. जलपातळी ४ हजार ५४ दलघफूपर्यंत वाढली असून, ३४५ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्रात जोर‘धार’ सुरू राहिल्याने साठ्यात वाढ झाली. त्र्यंबकमध्ये सर्वाधिक ११२, तर अंबोलीत ६१ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.

Web Title:  City and locality throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.