तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:49 PM2019-02-11T17:49:32+5:302019-02-11T17:49:36+5:30
सटाणा:बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी (दि.११)येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढुन तहसिलदार ...
सटाणा:बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी (दि.११)येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढुन तहसिलदार प्रमोद हिले यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकº्यांच्या थांबवण्यासाठी आत्महत्या मागील कारणे शोधुन उपाययोजना करावी, बागलाण तालु क्यात मोठ्या प्रमाणात कांदा, डाळींब पिकांचे उत्पादन घेतले जाते त्यासाठी प्रक्रि या उद्योग सुरू करावे, सटाणा शहराच्या बायपासचा निर्नय तातडीने घ्यावा, एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप नियमीत अदा करावे तसेच पोलीस कर्मचाº्यांना नियमावली लागु करु न कामाचे आठ तास द्यावे जेनेकरून त्यांच्या कामाचा ताण कमी होउन जनतेबरोबर ते सौजन्यांने वागतील या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या त्यांनी नमूद केल्या आहेत.
याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बच्छाव, तालुका सचिव सुनिल जगताप, शहर अध्यक्ष शेखर बच्छाव, सुनिलपवार, संदिप वाघ, कडु विनस, कैलास अहीरे, बाळासाहेब अहीरे, शेखर खरे, गोरख खरे, दिपक डावरे, महेंद्र सोनवणे आदींसहकार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात सहभागी भारिप महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.(11भारीप बहूजन)
भारिप बहुजन महासंघाचा सटाण्यात सिटी बजाव मोर्चा