शहर बससेवेला ‘ब्रेक’ ठरलेलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:12 AM2018-04-05T00:12:57+5:302018-04-05T00:12:57+5:30
शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे
नाशिक : शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे. नवनियुक्त विभाग नियंत्रकही त्याच धोरणात्मक निर्णयावर ठाम असून, बसफेºयांमध्ये टप्प्याटप्प्याने कपात यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
इंधन खर्च, दुरुस्ती खर्च, कामगारांना कि.मी.प्रमाणे दिले जाणारे वेतन अशा सर्वच बाजूंनी विचार करता शहराची बससेवा तोट्यात आहे. यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून बससेवा बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने बसफेºयांची कपात करावीच लागणार असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी स्पष्ट केले. पाच दिवसांपूर्वीच मैंद यांनी नाशिक परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकपदाची सूत्रे हाती घेतली असून, त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मैंद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार असून, त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महापालिकेने लवकरात लवकर बससेवा चालविण्याबाबतचा निर्णय घ्यावा यासाठी पुन्हा पत्र देणार आहे. बसफेºया कमी करणे महामंडळाला भाग आहे, कारण महामंडळाला बससेवा बंद करावयाची आहे. आर्थिकदृष्ट्या शहर बससेवेची चाके तोट्यात फिरत असल्यामुळे महामंडळाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. एकूणच महामंडळ आणि महापालिका या दोन संस्थांच्या प्रशासकीय कारभार आणि धोरणात्मक निर्णयांमुळे सर्वसामान्य नाशिककरांचा जीव टांगणीला लागला आहे. नाशिक कर ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचे अपुºया बससेवेमुळे हाल होत आहेत. आगामी काळात शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागताच पुन्हा बसफेºया अधिक कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत भूमिका घेऊन बससेवेविषयी ठोस तोडगा काढण्याची मागणी
होत आहे.
...म्हणे प्रवाशांच्या सेवेसाठी
राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिककरांवर सध्या अन्याय होत आहे. महामंडळाने तोट्याचे कारण पुढे करून शहर बससेवा थांबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे अधिकारी सांगतात. महापालिके कडे बससेवा हस्तांतरित करण्यात येणार असून, बससेवा यापुढे पालिका प्रशासनाने चालवावी, असा महामंडळाचा अट्टाहास आहे. मात्र, अद्याप पालिका प्रशासनाने तशी तयारी दर्शविली नसून हालचालीदेखील केलेल्या नसताना केवळ अट्टाहासापोटी महामंडळाकडून शहर बससेवेच्या फेºया कमी केल्या जात आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.
शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात सुरू असून, २५० बसफेºयांवरून त्या केवळ १२० वर आल्या आहेत. यामुळे विद्यार्थिवर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे हाल होत आहेत. बहुतांश भागातून बसेसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागते. शहराच्या विविध भागांमधील मार्गांवर बसेसची संख्या अत्यल्प झाल्यामुळे बससेवा म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महामंडळाकाडून बसफेºयांमध्ये केली जाणारी कपात अलीकडे अधिक वाढण्याची चिन्हे आहेत, कारण शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर बसफेºयांमध्ये अधिक कपात करण्याची संधी महामंडळाच्या नाशिक विभागाला मिळणार आहे.