सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:34 AM2020-01-11T01:34:49+5:302020-01-11T01:35:37+5:30
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.
नाशिक : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.
गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रात ३.३ केव्ही केबलची फिडरची जोडणी करणे, पाथर्डी फाटा येथील क्रॉस कनेक्शनचे काम करणे, बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन लक्ष गॅलन टाकीचा इनलेट पाइपची दुरुस्ती, सबस्टेशन येथील सीटीपीटी बसविणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथील व्हॉल्व्ह दुरुस्त करणे, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे गळती थांबविणे यांसह विविध प्रकारची कामे करण्यासाठी गंगापूर, चेहेडी आणि मुकणे येथील पाणीपुरवठा केंद्रांच्या शुद्धीकरणांचा वीजपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजेपासून नंतर पुढे शहरात पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे मंगळवारी (दि.१४) कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.