बालनाट्य स्पर्धेत नगरच्या नाटकाची बाजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:18 AM2022-03-26T01:18:02+5:302022-03-26T01:18:29+5:30
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून झालेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक-नगर केंद्रातून नगरच्या सप्तरंग थिएटरचे ‘मी तुझ्या जागी असते तर ...?’ या नाटकाने बाजी मारली, तर नाशिकच्या नाट्य सेवा थिएटर्सच्या ‘तुला इंग्रजी येतं का?’ या नाटकास व्दितीय पारितोषिक जाहीर झाले असून, दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
नाशिक : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून झालेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक-नगर केंद्रातून नगरच्या सप्तरंग थिएटरचे ‘मी तुझ्या जागी असते तर ...?’ या नाटकाने बाजी मारली, तर नाशिकच्या नाट्य सेवा थिएटर्सच्या ‘तुला इंग्रजी येतं का?’ या नाटकास व्दितीय पारितोषिक जाहीर झाले असून, दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नाशकात नुकतेच प. सा. नाट्यगृहात बालनाट्यांची स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत नाशिक आणि नगरमध्ये मिळून एकूण १५ नाटकांचे सादरीकरण झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद बेलगावकर, श्रीपाद येरमाळकर आणि जुई बर्वे यांनी कामकाज पाहिले होते.
इन्फो
बालनाट्य स्पर्धेचा निकाल
दिग्दर्शन : आरती अकोलकर, (मी तुझ्या जागी असते तर...?), रोहित जाधव (तुला इंग्रजी येतं का?)
प्रकाशयोजना : कृतार्थ कन्सारा (तुला इंग्रजी येतं का?), प्रा. राम कोरडे (सोनेरी पिंजऱ्यातला पोपट)
नेपथ्य : लक्ष्मीकांत देशमुख (गड बोलतोय), दीपक अकोलकर (मी तुझ्या जागी असते तर...?)
रंगभूषा : माणिक कानडे (जंगलातील दूरचा प्रवास), विशाल तागड (भट्टी)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : हर्षदीप अहिरराव (तुला इंग्रजी येतं का?), मनुजा देशमुख (मी तुझ्या जागी असते तर..?)
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र : प्रांजल सोनवणे, प्रचिती अहिरराव, मनश्री लगड, तेजश्री साबळे, गायत्री रोहकले, श्लोक देशमुख, सुमित गर्जे, श्लोक डहाळे, सौरव क्षीरसागर.