शहराला मिळाले मुकणे धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:35 AM2019-12-31T00:35:38+5:302019-12-31T00:36:03+5:30

नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने मुुकणे धरणातून थेट योजना राबविण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते.

 The city got water from the dam | शहराला मिळाले मुकणे धरणाचे पाणी

शहराला मिळाले मुकणे धरणाचे पाणी

googlenewsNext

नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने मुुकणे धरणातून थेट योजना राबविण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आधी आॅक्टोबर आणि त्यानंतर पुन्हा डिसेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मार्च २०१९ अशी डेडलाईन देण्यात आली आणि विशेष म्हणजे हे काम वेळेत पूर्ण झाले. २६६ कोटी रुपयांचा खर्च असलेले हे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने काम पूर्ण झाले आणि नागरिकांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत पाणी मिळाले. या धरणातून महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी वाढवून शहरासाठी पाणी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, आत्ताच या धरणातून १३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवले जात असून त्यामुळे शहरातील पाथर्डी, सिडकोसह अनेक भागातील वाढीव पाणी मागणीचा प्रश्न सुटला आहे. गेल्यावर्षी जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्याने शहरावर जलसंकट निर्माण झाले होते. त्याकाळात मुकणे धरणाची योजना शहरासाठी वरदान ठरली. आता सिडकोचा निम्मा भाग तसेच पाथर्डी, दाढेगाव परिसर या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन शहराच्या ७० टक्के भागात या योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मांजरपाडा प्रकल्पाचे ९७ टक्के काम पूर्ण
येवला आणि चांदवड तालुक्याला मृगजळ वाटणाºया मांजरपाडा प्रकल्पाचे ९७ टक्के काम पूर्ण झालेले आहे. उरलेले बोगद्याचे ३०० मीटर किरकोळ काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहे. पुणेगाव दरसवाडी कालव्याचे विस्तारीकरण करण्याचे काम हाती घेतले जाण्याची गरज आहे. काही ठिकाणी कालव्याचे विस्तारीकरण आणि संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्याची गरज आहे. पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. ८.९६ कि.मी लांबीच्या बोगद्याद्वारे पश्चिमेला जाणारे पाणी पुणेगाव धरणात टाकण्यात येणार आहे. या वळणयोजनेतून ६०६ द.ल.घ.फू पाणी उपलब्ध होणार आहे. १५० किलोमीटरच्या या कालव्याचे अस्तरीकरण झाल्याशिवाय पाणी थेट डोंगरगावपर्यंत येऊ शकत नसल्याचा अनुभव चर्चेत असला तरी, कातरणीपर्यंत पाणी पाहून आता डोंगरगाव फार दूर नाही तर हे पाणी आता मराठवाड्यापर्यंत जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मांजरपाडा काम पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. तातडीने हे काम व्हावे अशी अपेक्षा येवल्याच्या जनतेला आहे. तीन पिढ्या केवळ आश्वासने झेललेल्या तालुकावासीयांना आता शाश्वत पाणी मिळण्याचा आशावाद पुन्हा जागवला गेला. कालव्यातून पाणी जलद गतीने प्रवाहित होण्यासाठी काही ठिकाणी कालव्याचे रुं दीकरण, संपूर्ण अस्तरिकरण ही कामे मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. पुन्हा एकदा अस्तरीकरणाची गरज अधोरेखित झाली आहे. यासाठी किमान ३०० ते ४०० कोटी रु पये खर्चाची आवश्यकता आहे. पश्चिमेकडे समुद्रात आणि गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे बोगद्यातून पूर्वेकडे पुणेगावमध्ये आणायचे ही स्वप्नवत वाटणारी कल्पना प्रत्यक्षात यायला सुरु वात झाली आहे. या योजनेचे केवळ ३०० मीटर काम आज बाकी आहे.

Web Title:  The city got water from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.