शहरात वाढला थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:02 AM2019-12-20T01:02:47+5:302019-12-20T01:03:57+5:30

शहरात थंडीचा कडाका पुन्हा अचानक वाढला. गुरुवारी (दि.१९) सक ाळी ८ वाजेच्या सुमारास हवामान निरीक्षण केंद्राकडून १३.६ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. तसेच निफाडमध्ये पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. राज्यात सर्वाधिक किमान तापमान निफाडमध्ये नोंदविले गेले. त्यामुळे निफाडसह शहरातील नागरिकांनाही चांगलीच हुडहुडी गुरुवारी जाणवली.

The city grew colder | शहरात वाढला थंडीचा कडाका

शहरात वाढला थंडीचा कडाका

googlenewsNext
ठळक मुद्देहुडहुडी : पारा १६ अंशांवरून थेट १३ अंशांपर्यंत घसरला

नाशिक : शहरात थंडीचा कडाका पुन्हा अचानक वाढला. गुरुवारी (दि.१९) सक ाळी ८ वाजेच्या सुमारास हवामान निरीक्षण केंद्राकडून १३.६ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. तसेच निफाडमध्ये पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. राज्यात सर्वाधिक किमान तापमान निफाडमध्ये नोंदविले गेले. त्यामुळे निफाडसह शहरातील नागरिकांनाही चांगलीच हुडहुडी गुरुवारी जाणवली.
मागील तीन दिवसांपासून शहराचे किमान तापमान १६ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र गुरुवारी सकाळी अचानकपणे पारा घसरला. त्यामुळे नाशिककरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. रविवारपासून किमान तापमानात ढगाळ हवामानामुळे वाढ होऊ लागली होती. गेल्या शुक्रवारी शहराचा पारा १२ अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले होते. त्या तुलनेत थंडीचा जोर मंगळवारपर्यंत कमी झाला; मात्र पुन्हा गुरुवारी पारा खाली आल्याने मागील आठवड्याप्रमाणेच या शुक्रवारी व शनिवारी नीचांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निफाडच्या हवामान केंद्रात या हंगामात गेल्या आठवड्यात १२.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले होते. नाशिककर उबदार कपड्यांचा वापरास प्राधान्य देत आहेत. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी पहाटे व सकाळी थंडीपासून बचाव करताना दिसून येत आहे. गुरुवारी किमान तापमान घसरल्याने चाकरमान्यांनी दिवसभर गरम कपडे परिधान करून कार्यालयात दैनंदिन कामकाज आटोपले.

Web Title: The city grew colder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.