शहर झाले हगणदारीमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:57 AM2017-08-03T00:57:50+5:302017-08-03T00:57:53+5:30

नाशिक : महापालिकेने शहरात वैयक्तिक शौचालय उभारणीत घेतलेली आघाडी, नागरिकांना उघड्यावर शौचविधी करण्यास गुड मॉर्निंग पथकामार्फत करण्यात आलेला प्रतिबंध आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेले प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये याची दखल घेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या समितीने नाशिक शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित केले आहे. तीनच महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक घसरल्यानंतर हिरमुसलेल्या महापालिकेला शहर हगणदारीमुक्त झाल्याचा सुखद धक्का बसला आहे.

City has become free! | शहर झाले हगणदारीमुक्त !

शहर झाले हगणदारीमुक्त !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेने शहरात वैयक्तिक शौचालय उभारणीत घेतलेली आघाडी, नागरिकांना उघड्यावर शौचविधी करण्यास गुड मॉर्निंग पथकामार्फत करण्यात आलेला प्रतिबंध आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेले प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये याची दखल घेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या समितीने नाशिक शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित केले आहे. तीनच महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक घसरल्यानंतर हिरमुसलेल्या महापालिकेला शहर हगणदारीमुक्त झाल्याचा सुखद धक्का बसला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या समितीने नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात हगणदारीमुक्तीसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांची पाहणी केली होती. शासनाचे निर्देश व निकष आणि महापालिकेने केलेली अंमलबजावणी, राबविलेले उपक्रम यांची दखल घेत समितीने नाशिक शहर हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. मात्र, शहरात अद्यापही काही झोपडपट्टी परिसरात उघड्यावर सर्रास शौचविधी होत असताना समितीने शहर हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्याने महापालिकेला आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
या घोषणेला अनुसरून महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनी गेल्या वर्षभरात हगणदारीमुक्तीसाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती प्रसिद्धीस दिली आहे. महापालिकेने केलेल्या दाव्यानुसार, नागरिकांनी उघड्यावर शौचास न बसता शौचालयांचा वापर करावा, याकरिता बॅनर्स, पोस्टर्स, माहितीपत्रके यांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात आले. विभागातील विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत दैनंदिन पाहणी करून नागरिक उघड्यावर शौचास बसणारी ठिकाणे बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आली. गुड मॉर्निंग पथकाद्वारे सकाळी पाहणी करून उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आणि त्यानुसार, आवश्यक त्या ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आल्याचे म्हटले आहे. ७२६४ शौचालयांची उभारणीकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक महापालिकेला शौचालय उभारणीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. त्यात आतापर्यंत महापालिकेने ७२६४ लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता सुमारे ८ कोटी ८५ लाख रुपये इतके अनुदान वाटप केले आहे.
याशिवाय, २५ सामुदायिक शौचालयांचे बांधकाम केल्याचाही दावाही महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने केला आहे. अद्यापही शहरात शौचालय उभारणीचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. तीन महिन्यांपूर्वी घोषित झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली होती. ४३४ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर घसरले गेले होते. त्यावेळी सोलापूर, ठाणे आणि धुळे या शहरांपेक्षाही नाशिक गलिच्छ असल्याचे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आले होते. आता तीन महिन्यांनंतर केंद्राच्याच समितीने नाशिक हगणदारीमुक्त झाल्याचे सर्टिफिकेट बहाल केले आहे. त्यामुळे महापालिका सुखावली आहे.

Web Title: City has become free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.