शहरात सात आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिया माहिती केंदे्र
By admin | Published: May 25, 2017 01:30 AM2017-05-25T01:30:41+5:302017-05-25T01:30:58+5:30
नाशिक : आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिये दरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात सात ठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिये दरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात सात ठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांची रचना झोननुसार करण्यात आली असून, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना त्या भागाशी संबंधित केंद्रात प्रवेशप्रक्रियेसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरातील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयीची सर्व माहिती त्यांच्या शाळांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यकता भासल्यासच संपर्क साधण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. या मार्गदर्शन कें द्राची सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांसाठी नाशिकरोडचे बिटको महाविद्यालय व नाशिक शहरातील बीवायके महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर विद्यार्थिनींसाठी व गृहविज्ञान शाखा अभ्यासक्रमासाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कें द्र सुरू करण्यात येणार आहे. हिंदी माध्यमांच्या संयुक्त शाखांसाठी अंबड पोलीस ठाणे परिसरातील हिंदी माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
झोननिहाय मार्गदर्शन केंद्र
झोन-१
गंगापूररोड, पंडित कॉलनी, एसटी कॉलनी, प्रमोदनगर, रामवाडी, जुना आग्रारोड, सारडा सर्कल आदी परिसरासाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर गंगापूर गाव, सोमेश्वर, ध्रुवनगर, सोमेश्वर कॉलनी, गणेशनगर या परिसरासाठी गंगापूररोड भागातील सीएमसीएस महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
झोन-२
शरणपूर, टिळकवाडी, तिडके कॉलनी, गोविंदनगर, सद्गुरूनगर व जुने नाशिक या परिसरासाठी बीवायके महाविद्यालयात केंद्र असणार आहे. तर सातपूर कामगारनगर, एमआयडीसी, पिंपळगाव बहुला, सातपूर अंबड लिंकरोड या भागासाठी भोसला मिलिटरी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र असणार आहे.
झोन-३
पंचवटी, औरंगाबादरोड, आडगाव द्वारका या भागासाठी पंचवटी महाविद्यालयात तर मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद परिसरासाठी ए. पी. पटेल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमाणी, पंचवटी येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
झोन-४
सिडको, कामठवाडे, अंबड व पाथर्डी फाट्यासाठी सिडकोतील केएसडब्ल्यू महाविद्यालयात आणि इंदिरानगर, पाथर्डीगाव व वडाळागाव भागासाठी इंदिरानगरमधील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र स्थापन क रण्यात येणार आहे.
झोन-५
नाशिकरोड, जेलरोड, चेहेडी, देवळाली गाव, बिटको, दत्तमंदिर,गांधीनगर, कॅनॉलरोड व नारायण बापूनगर परिसरासाठी नाशिकरोड बिटक ो महाविद्यालय व छावणी परिषद परिसर, वडनेर गेट या भागातील विद्यार्थ्यांसाठी देवळाली कॅम्पच्या एसव्हीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.