आणखी दोन मार्गावर सिटी लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:02+5:302021-09-16T04:20:02+5:30
नाशिक महापालिका परिवहन महामंडळाची बससेवा ८ जुलैपासून सुरू झाली. पहिल्या वेळी नऊ मार्गांवरील सेवेसाठी २७ बस होत्या. मात्र गरजेनुसार ...
नाशिक महापालिका परिवहन महामंडळाची बससेवा ८ जुलैपासून सुरू झाली. पहिल्या वेळी नऊ मार्गांवरील सेवेसाठी २७ बस होत्या. मात्र गरजेनुसार आणि प्रवाशांच्या मागणीनुसार बसगाड्यांची संख्या आणि मार्ग वाढवण्यात येत आहेत सध्या तर दर दिवसाला सरासरी वीस हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहेत. त्यात आता दोन नवीन मार्गाची भर पडणार आहे. यात
नाशिकरोड ते म्हाडामार्गे भाभानगर, सह्याद्री हॉस्पिटल, मुंबई नाका, प्रकाश पेट्रोलपंप, गोविंद नगर, सिटी सेंटर मॉल, उंटवाडी, त्रिमुर्ती चौक, कामटवाडा, डिजीपी -२, केवलपार्क हा एक मार्ग वाढवण्यात आला असून नाशिकरोड ते आडगावमार्गे द्वाका, कन्नमवार ब्रिज, पंचवटी कॉलेज, आडगाव नाका, जत्रा हॉटेल असा दुसरा असणार मार्ग आहे. यामुळे शहरातील मार्गांची संख्या आता २२ वर पोहचली आहे.इन्फो...
अनेक नवीन भागात मागणी
महापालिकेकडे दररोजच नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी वाढत असून कंपनी मात्र जपून पावले उचलत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी शंभर टक्के निर्बंध शिथिल झालेले नाही. तसेच शाळा महाविद्यालये सुरू नसल्याने प्रशासन आस्ते कदम घेत आहे.