पेठ शहरात चाेरट्यांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:26+5:302021-02-26T04:19:26+5:30

पेठ तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या उपस्थितीत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन चोरीच्या घटनेचा जलदगतीने ...

The city of Peth is full of chariots | पेठ शहरात चाेरट्यांचा धुडगूस

पेठ शहरात चाेरट्यांचा धुडगूस

Next

पेठ तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या उपस्थितीत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन चोरीच्या घटनेचा जलदगतीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी मनोज घोंगे, कुमार मोंढे, संतोष डोमे, पुंडलिक महाले, गणेश शिरसाट, जगदीश शिरसाट, बापू पाटील, विक्रम चौधरी, प्रकाश धुळे, पद‌्माकर कामडी, संदीप पगारे, रोहिदास चौधरी, सुरेश महाले यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पेठ शहरातील वाढत्या चोरीच्या घटना पाहता नगरपंचायतीने मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने नगरपंचायत प्रशासन अधिकारी चंद्रकांत भोये यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उपतालुका अध्यक्ष नेताजी गावित, नगरसेवक चेतन निखळ, सरचिटणीस अंकुश चौधरी, संपर्क प्रमुख राहुल मानभाव आदी उपस्थित होते.

फोटो

- २५ पेठ पोलीस

पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देताना भास्कर गावित, मनोज घाेगे, कुमार मोंढे, संतोष डोमे, पुंडलिक महाले.

===Photopath===

250221\25nsk_10_25022021_13.jpg

===Caption===

 फोटो - २५ पेठ पोलीस पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देतांना भास्कर गावित, मनोज घाेगे, कुमार मोंढे, संतोष डोमे, पुंडलिक महाले. 

Web Title: The city of Peth is full of chariots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.