नव्याने देणार ठेका : शहर पोलीस पुन्हा राबविणार ‘टोइंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:55 PM2020-07-05T16:55:58+5:302020-07-05T17:00:41+5:30

यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

City police to resume towing | नव्याने देणार ठेका : शहर पोलीस पुन्हा राबविणार ‘टोइंग’

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देबेशिस्त पार्किंगमध्ये वाढवाहतूक शाखेची वाढली डोकेदुखीतीन महिन्यांचा असेल नवीन ठेका

नाशिक : शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पध्दतीने बेशिस्तरित्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधिन राहून ‘नो पार्किंग झोन’मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे.
शहरात यापुर्वीही पोलीस आयुक्तालयाकडून टोइंगची कारवाई करण्यात येत होती. मात्र ठेकेदाराकडून नेमलेल्या वाहनांवरील कामगारांचे असभ्य व उध्दट वर्तन आणि अरेरावीमुळे पोलिसांचीही प्रतिमा मलीन होण्यास सुरूवात झाली. शहरातून टोइंगविरोधात तक्रारी वाढल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये टोइंगची कारवाई थांबविण्यात आली आणि ठेका तत्काळ रद्द केला गेला. जानेवारीअखेर रद्द करण्यात आलेल्या या ठेक्यामुळे नाशिककरांना दिलासा जरी मिळाला असला तरी काही नियमबाह्य वागणाºया नागरिकांकडून त्याचा गैरफायदा घेत वाहतूकीला अडथळा निर्माण होईल या पद्धतीने सर्रासपणे वाहने उभी केली जाऊ लागली. यामुळे पुन्हा शहर वाहतुक पोलिसांची डोके दुखी वाढली. सध्या मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे लॉकडाऊनची प्रक्रिया राबविली जात आहेत. तसेच जमावबंदी, संचारबंदी कायद्याचीही पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे; मात्र तरीही सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान, शहरातील वर्दळीच्या भागात तसचे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येते. विविध रस्त्यांच्याकडेला दुतर्फा जागा मिळेत तेथे अगदी बेशिस्तपणे वाहने उभी केली जाऊ लागल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण तर मिळतेच मात्र अशावेळी वाहनचालकांकडून विनाकारण हॉर्न वाजविण्यावर भर दिला जातो आणि ध्वनीप्रदूषणातही भर पडते.


 ही प्रक्रिया साधारणत: महिनाभर चालणार आहे, यानंतर प्रत्यक्षात टोइंग व्हॅन रस्त्यांवर दिसतील; मात्र यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

Web Title: City police to resume towing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.