शहर पोलिसांनी  चोरीचे २२१ मोबाइल केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:45 AM2019-05-25T00:45:08+5:302019-05-25T00:45:31+5:30

शहरासह विविध ठिकाणांहून चोरीला गेलेले ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाइल शहर पोलिसांनी जप्त केले आहेत.

City police seized 221 mobile theft | शहर पोलिसांनी  चोरीचे २२१ मोबाइल केले जप्त

शहर पोलिसांनी  चोरीचे २२१ मोबाइल केले जप्त

Next

मालेगाव : शहरासह विविध ठिकाणांहून चोरीला गेलेले ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाइल शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. आयएमईआय क्रमांक बदलून मोबाइल विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने संशयितांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना शहरात चोरीचे मोबाइल आयएमइआय क्रमांक बदलून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार प्रशांत पवार, सचिन अहिरे, राहुल गांगुर्डे, पंकज डोंगरे, दादा मोहिते, पिंटू पावरा, सचिन पगारे, अशफाक शेख, इम्रान सय्यद आदींच्या पथकाने सरदार मार्केटसमोरील बांबू बाजारात चोरीचे मोबाइल विक्री करणाºया रईस शहा अब्बास शहा (२०), रा. कमालपुरा यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून २९ हजार रुपये किमतीचे आयएमईआय क्रमांक बदलेले चार अ‍ॅण्ड्राइड मोबाइल ताब्यात घेण्यात आले. त्यास पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सदर मोबाइल एजाज अहमद वल्द मोहंमद (२७), रा. चंदनपुरी गेट याच्या मोबाइल शॉपी दुकानात लॉक तोडण्यासाठी दिले होते. तसेच सदर मोबाइल चोरीचे असल्याची कबुली दिली होती.
शहर पोलिसांनी एजाज अहमद वल्द मोहंमद याच्या चंदनपुरी गेट भागातील दुकानात छापा टाकला असता त्याच्या दुकानात विविध कंपन्यांचे मोबाइल संशयास्पदरीत्या आढळून आले. तसेच मोबाइलच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या, नोंदणी रजिस्टर मिळून आले नाही.  त्याची चौकशी केली असता ९ अ‍ॅण्ड्राइड मोबाइचे आयएमईआय क्रमांक बदललेले उघडकीस  आले.  दुकानात आयएमइआय क्रमांक बदलण्यासाठी लागणारे साहित्य संगणक, मिरॅकल बॉक्स, इन्फीनिटी बॉक्स, स्पाइडरमॅन केबल मिळून आले. तसेच चोरीचे २२१ मोबाइल असा एकूण ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
हवालदार पंकज डोंगरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एजाज अहमदवर दुसऱ्यांदा कारवाई
चंदनपुरी गेट भागात मोबाइल रिपेरिंगचे दुकान असलेल्या एजाज अहमद वल्द मोहंमद याच्याकडून यापूर्वीदेखील पोलिसांनी छापा टाकून चोरीचे मोबाइल जप्त केले होते. त्याच्यावर आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाइलचे टॉवर लोकेशन घेण्यासाठी सीडीआर, एसडीआर, डमडाटा मिळाल्यावर एकाच क्रमांकाचे अनेक आयएमईआय क्रमांक मिळून येत असल्याने पोलिसांना तपासात अडचण निर्माण झाली आहे. ज्या नागरिकांचे मोबाइल चोरीला किंवा गहाळ झाले असतील अशा नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: City police seized 221 mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.