शिवजन्मोत्सवासाठी अवघे शहर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:09 AM2018-02-19T01:09:12+5:302018-02-19T01:13:02+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा होत असून, शहरात सर्वत्र उत्सव शिगेला पोहचला आहे. भगवे ध्वज आणि पताकांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे, तर शहरात ठिकठिकाणी शिवरायांच्या जीवनकार्यावरील भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळा समितीने जाहीर केलेल्या नियोजित मार्गावरून म्हणजेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून सकाळी ९ वाजता शिवपालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.

शिवश्री छत्रपती महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वधर्मीयांना सहभागी करून घेत या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार असल्याचे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सांगण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण शिवपालखी मिरवणूक असून ढोलपथक, लेझीम पथम, आदिवासी नृत्य आणि शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील चार जिवंत चित्ररथ असणार आहे.
सकाळी ९ वाजता गोल्फ क्लब मैदान येथे माता जिजाऊ आणि शिववंदन होऊन शिवगर्जना करण्यात येणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून सकाळी ९ वाजता शिवपालखी सोहळ्याला
प्रारंभ होणारअसा आहे मिरवणूक मार्गगोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ९ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजामार्गे पालखी रामकुंडावर नेण्यात येणार आहे. याठिकाणी अभिषेक सोहळा होणार आहे.मिरवणुकीत असतील असे देखावेया पालखी मिरवणुकीत संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट असा देखावा, जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा देखावा, तर शहाजी राजे तसेच संभाजी राजे यांचा देखावा, पालखी मिरवणूक सोहळ्यात असणार आहे.