शहर स्मार्ट, मंदिरांवर झुडपे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:10 PM2020-08-27T22:10:36+5:302020-08-28T00:38:49+5:30
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियनातील यशानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या कामगिरीत देखील महापालिकेने बाजी मारली. मात्र, शहरातील पुरातन मंदिरांची मात्र दुरवस्था झाली आहेत. विशेषत: मंदिरांवर झुडपे उगवली आहेत. या मंदिरांच्या संवर्धनासाठी मात्र कोणतीही व्यवस्था नसल्याने भाविकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरातील गोदाकाठी असलेली बहुतांश मंदिरे पुरातन आहेत. त्यातही निळकंठेश्वर आणि सुंदरनारायण मंदिर हे दोन पुरातत्व विभागाकडे अधिसूचीत आहेत. बाकी बहुतांश मंदिरे खासगी मालकीची आहेत. तर काही ट्रस्टच्या अंतर्गत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या कन्व्हर्जन अंतर्गत सुंदरनारायण मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. पुरातत्व विभाग हे काम करीत आहे. मात्र, अन्य काही मंदिरांची अवस्था फारशी चांगली नाही. महापालिकेच्या वतीने गेल्या कुंभमेळ्यात बहुतांश मंदिरांची डागडूजी करण्यात आली होती. तसेच काळा रंग देखील देण्यात आला. मात्र, आता मंदिरांवर झुडपे उगली असताना त्याकडे मात्र पुरेसे लक्ष नाही. मनपा,पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा शहरात अशाप्रकारच्या पुरातन वास्तुंचे संवर्धन करण्यासाठी हेरीटेज कमीटीची गरज आहे. सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी समिती तयार करण्यात आली होती. मात्र, ती अल्पायुषी ठरली. त्यामुळे शहरातील केवळ मंदिरेच नव्हे तर पुरातन कोट आणि अशा अन्य जुन्या वास्तूंच्या सर्वंधन देण्याची गरज आहे . शहराची ओळख किंवा वैशिष्टय ठरणा-या वास्तुंबाबत पालकसंस्था महापालिका आणि पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.