शहरात आज, उद्या बाजारपेठा राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:26 AM2021-03-13T01:26:56+5:302021-03-13T01:27:45+5:30

कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील.

In the city today, the markets will be closed tomorrow | शहरात आज, उद्या बाजारपेठा राहणार बंद

शहरात आज, उद्या बाजारपेठा राहणार बंद

Next

नाशिक : कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. या बंदसाठी  जिल्हा, तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, शहरातील बंदबाबत महापालिका ॲक्शन मोडवर असून, सर्व प्रकारची सज्जता मनपाने ठेवली आहे.      जिल्ह्यात कोराेनाचे रुग्ण वाढत असल्याने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारपासून जिल्ह्यात काही निर्बंध लागू केले  आहेत. त्यानुसार, सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.  शनिवार आणि रविवार बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यानुसार, शनिवारी (दि.१३) बंदचा पहिला दिवस आहे.

Web Title: In the city today, the markets will be closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.