शहर विद्रूपीकरण; मनपातर्फे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:36 AM2019-02-25T00:36:18+5:302019-02-25T00:37:29+5:30
महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर विद्रूपीकरणविरोधात ‘लोकमत’ने उघडलेल्या मोहिमेला महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात न्यू प्रभात कॉम्प्युटर्स अॅन्ड टायपिंग इन्स्टिट्यूट, अग्निपंख अकॅडमी, बंदूकघर, युरो किड्स आदी व्यावसायिकांचे बॅनर्स, पोस्टर चिकटवून सºहास विद्रूपीकरण केल्याप्रकरणी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी काळे, हिरामण महाले, बाळकृष्ण सोनार आदींनी कारवाई करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदिरानगरला गुन्हा
लोकमतने शहरातील विद्रूपीकरणाच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकल्यानंतर यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यातही काही व्यावसायिकांची जाहिरात करणाºयांवर अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता इंदिरानगर पोलीस ठाण्यातही ठिकठिकाणी बॅनर्स व होर्डिंग लावून शहर विद्रूपीकरणविरोधात महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.