तिरंगी लढतीकडे शहराचे लक्ष

By admin | Published: November 17, 2016 11:17 PM2016-11-17T23:17:40+5:302016-11-17T23:21:44+5:30

येवला : राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर झुंजणार

City's attention towards tri-match | तिरंगी लढतीकडे शहराचे लक्ष

तिरंगी लढतीकडे शहराचे लक्ष

Next

येवला : सलग दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीने उमेदवारीचे गाजर दाखवले, पक्ष बदलला, भाजपाने थेट उमेदवारीचे आश्वासन दिले. पुन्हा डावलले गेले. नाराजी झाली. पुन्हा बंडाचा पवित्र घेऊन भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांनी अपक्ष उमेदवारी केली. निवडणूक म्हटली तर कोणीतरी एकच उमेदवार विजयी होणार असला तरी या प्रभागात तिरंगी लढतीत मात्र रंगत आली आहे.
येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ अ मधून चंदा सोहन दुगड (राष्ट्रवादी), छाया शैलेश देसाई (शिवसेना), कृष्णा संतोष परदेशी (कॉँग्रेस) व प्रीतिबाला राजीव पटेल (भाजपा बंडखोर- अपक्ष) हे चार उमेदवार रिंगणात असले तरी लढत मात्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर-अपक्ष उमेदवार यांच्यात आहे.
येवला पालिकेच्या प्रभाग क्र मांक ७ अ मधून राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीत भाजपाने प्रीतिबाला पटेल यांना उमेदवारीची संधी देण्याचा निश्चय केला होता; परंतु या संपूर्ण प्रभागात भाजपा-सेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. (वार्ताहर)४शिवसेनेने या प्रभागात दोन्ही जागांवर हक्क सांगितला. आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांना पक्षाची उमेदवारी रोखली गेली. संतप्त झालेल्या प्रीतिबाला पटेल यांच्या मनधरणीचा पाढा वाचला गेला. परंतु गुजराथी समाजाच्या मतांच्या गणिताची आकडेवारी लक्षात घेऊन रणांगणात लढणे पसंत करीत अपक्ष उमेदवारी केली. दुसरीकडे शिवसेनानेते संभाजीराजे पवार समर्थक छायाबाई शैलेश देसाई यांना उमेदवारी बहाल करून गुजराथी समाजाला संधी दिली, तर राष्ट्रवादीने सुप्रसिद्ध कपडा व्यापारी चंदा सोहनलाल दुगड यांना उमेदवारी देऊन जैन कार्ड टाकले. आता प्रीतिबाला पटेल किती ताकद लावतात आणि गुजराथी अथवा मारवाडी समाजाची किती मते खेचतात की देसाई अथवा दुगड यापैकी कोणाच्या विजयाचे गणित बिघडवतात हे प्रत्यक्ष मतदानातून कळेल. तोपर्यंत ही तिरंगी लढत चर्चेत येणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रभागात कायम प्रभाव ठेवून असणारे पंकज पारख आणि नीलेश पटेल, भाजपाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार सुशीलभाई गुजराथी, संभाजी पवार यांची सक्रि य मदत व त्यांची या प्रभागातील निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मारवाडी,गुजराथी समाजाची निर्णायक ९०० मते,यांची ध्रुवीकरणाची प्रक्रि या उमेद्वारच्या वातावरणानुसार बदलली जाणारी आहे.या प्रभागात असणारा मतदार हा येवला मर्चंट बँकेचा मतदार आहे.सुज्ञ ,सुशिक्षति मतदार असल्याने क्र ॉस मतदानाचा प्रयोग करण्याची त्यांची अभ्यासपूर्ण पद्धत विजयाच्या गणतिावर परिणाम करणारी आहे.कार्यकर्त्यांचे मोहळ असून चालत नाही.अंतिम टप्प्यात आर्थिक बाजू महत्वाची ठरते हाच मुद्दा निर्णायक विजय मिळवून देणारा ठरणार आहे.साळी गल्ली,देशपांडे गल्ली,हमाल गल्ली हा भाग विजयाच्या प्रक्रि येत महत्वाचा आहे.भाजप शहर अध्यक्ष आनंद शिंदे आण िमहिला आघाडीच्या प्रीतीबाला पटेल यांना या प्रभागातून भाजपच्या उमेदवारीवरून नगरसेवक पदावरून आउट व्हावे लागले आहे.हि घटना निवडणुकीचे गणति बिघडवते का? हे पाहण्यासाठी वाट बघावी लागेल.

Web Title: City's attention towards tri-match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.