शहराचा पारा १३.६ अंशांवर; गारठा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:40 AM2017-12-21T00:40:41+5:302017-12-21T00:41:04+5:30
शहराच्या किमान तपमानाचा पारा मंगळवारी अचानकपणे १२ अंशांवरून थेट १० अंशांपर्यंत घसरला होता; मात्र जितक्या झपाट्याने पारा घसरला तितकाच वेगाने पुन्हा वर सरकला. बुधवारी (दि.२०) शहराचे किमान तपमान १३.६ अंशांवर पोहचले होते.
नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा मंगळवारी अचानकपणे १२ अंशांवरून थेट १० अंशांपर्यंत घसरला होता; मात्र जितक्या झपाट्याने पारा घसरला तितकाच वेगाने पुन्हा वर सरकला. बुधवारी (दि.२०) शहराचे किमान तपमान १३.६ अंशांवर पोहचले होते. मागील काही दिवासांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरता होता. मंगळवारी किमान तपमान १० अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिक जाणवली त्याचा प्रभाव सकाळी फेरफटका मारणाºयांच्या संख्येवरही दिसून आला. डिसेंबरअखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात असताना अचानकपणे बुधवारी किमान तपमानाचा पारा थेट तीन अंशांनी वर सरकला. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला. तसेच उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी पुन्हा बाजारपेठेकडे नागरिकांची पावले वळाली.