शहराचा पारा १० अंशावर घसरला; नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:27 PM2017-12-19T16:27:23+5:302017-12-19T16:29:39+5:30

मंगळवारी किमान तपमान १० अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता पुन्हा अनुभवयास येत आहे.

The city's mercury dropped to 10 degrees; Hoodhus filled with Nashikar | शहराचा पारा १० अंशावर घसरला; नाशिककरांना भरली हुडहुडी

शहराचा पारा १० अंशावर घसरला; नाशिककरांना भरली हुडहुडी

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकच्या निफाडमध्ये मंगळवारी ९.८ अंश मंगळवारी किमान तपमान १० अंश

नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा मंगळवारी (दि.१९) अचानकपणे १२ अंशावरून थेट १० अंशापर्यंत घसरला. ओखी वादळानंतर शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून किमान तपमानाचा पारा पंधरा ते बारा अंशाच्या जवळपास राहत होता; मात्र मंगळवारी पारा खाली घसरल्याने हवेत प्रचंड गारवा जाणवला.
मागील काही दिवासांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरता होता. मंगळवारी किमान तपमान १० अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता पुन्हा अनुभवयास येत आहे. डिसेंबरअखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये मंगळवारी ९.८ अंश इतके नीचांकी तपमान नोंदविले गेले. निफाड तालुका थंडीने गारठला असून शहरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. पहाटे बोच-या थंडीमुळे फेरफटका मारणा-यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते.
मागील आठवड्यात शहराचे किमान तपमान १५ अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तपमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे रविवारी दूपारपासून ढग दाटल्याने किमान तपमानाचा १२ अंशाच्या जवळपास राहिले होते; मात्र ढगाळ हवामान कमी झाल्याने अचानकपणे मंगळवारी दोन अंशांनी पारा घसरला. हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. ढगाळ हवामान असले तरी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर नाशिककरांना थंडी जाणवत होती. नाशिककरांनी पुन्हा उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. मंगळवारी सकाळपासून दिवसभर काही चाकरमान्यांनी कार्यालयांमध्येही उबदार कपडे परिधान करणे पसंत केले. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नाशिककरांना हुडहुही भरली अहे.

Web Title: The city's mercury dropped to 10 degrees; Hoodhus filled with Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक